पं. नेहरूंबद्दल ‘आक्षेपार्ह’ वक्तव्य करणार्‍या अभिनेत्री पायल रोहतगीला जामीन ‘मंजूर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि त्याचे वडील मोतीलाल नेहरु यांच्या विरोधात वादग्रस्त व्हिडिओ बनवणे आणि तो शेअर करण्याच्या प्रकरणात अभिनेत्री पायल रोहतगीला न्यायलयाने 24 डिसेंबरपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती त्यानंतर आज पायलला जामीन मंजूर झाला आहे. पायलला या प्रकरणी बूंदी पोलिसांकडून अहमदाबादमधून ताब्यात घेण्यात आले होते. पायल रोहतगीला 25,000 रुपये जमा करुन जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणी ट्विटरवर पीएम मोदी आणि गृहमंत्रालयाकडे तिने मदत मागितली होती. तिला या प्रकरणी मदत मिळाली नाही. तिच्या जामीन याचिकेला देखील न्यायालयाने रद्दबातल ठरवले होते. ज्यानंतर तिला 24 डिसेंबरपर्यंत तुरुंगात राहावे लागणार होते. परंतू आज तिला जामीन देण्यात आला.

पायलच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरली कारण तिने स्वत: ट्विट करत याची माहिती दिली. तिने ट्विट केले की मला मोतीलाल नेहरूंवर तयार करण्यात आलेल्या एका व्हिडिओमुळे राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हिडिओमध्ये देण्यात आलेली माहिती मी गुगलवरुन मिळवली होती. अभिव्यक्ती स्वतंत्र फक्त नावाला आहे का?

काय आहे पायलच्या विरोधात तक्रार –
पायल रोहतगीच्या विरोधात समाजिक कार्यकर्ता आणि यूथ काँग्रेसचे चर्मेश शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार चर्मेश शर्मा यांचा आरोप आहे की या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीच्या मृत्यूबाबात अशी बाब मांडण्यात आली आहे की ज्याचा भारत आणि परदेश संबंधांवर प्रभाव होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/