खुशखबर ! Paytm ची Google Play Store वर ‘वापसी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल डिजिटल पेमेंट अँप पेटीएमला गुगल प्ले स्टोअर वरून काढण्यात आले होते. ज्यानंतर वापरकर्ते खूप निराश झाले होते, परंतु वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी आहे की या अँपने गुगल प्ले स्टोअरवर पुनरागमन केले आहे. आता अँड्रॉइड वापरकर्ते पेटीएम आरामात डाउनलोड करू शकतात. कंपनीने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे ही माहिती शेअर केली आहे.

पेटीएमने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती शेअर करत म्हटले आहे की पेटीएम पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर आला आहे. यापूर्वी कंपनीने ट्विटरवर अशी माहिती दिली होती की पेटीएम काही काळासाठी डाउनलोडसाठी उपलब्ध नाही आणि वापरकर्त्यांना लवकरच अँप परत येणार असल्याचे आश्वासनही दिले होते.

वापरकर्त्यांना दिली होती हमी
गुगल प्ले स्टोअर वरून काढल्यानंतर पेटीएमने सांगितले की आम्ही लवकरच परत येऊ आणि तुमची रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे. आपण पेटीएम सहजपणे वापरू शकता. हे अँप केवळ अ‍ॅन्ड्रॉइड प्लॅटफॉर्मवरून काढले गेले आहे, आता ते प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

अँपला प्ले स्टोअरमधून काढून टाकण्याचे कारण ‘हे’ होते
गूगल प्ले स्टोअर वरून पेटीएम काढल्यानंतर गुगलने आपल्या ब्लॉगद्वारे पेटीएम कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याची बातमी दिली. गुगल म्हणते की ऑनलाइन कॅसिनो व अन्य जुगार अँप्स भारतात वापरता येणार नाहीत आणि ते आमच्या धोरणाच्या विरोधात आहेत. जर कोणी असे केले तर ते धोरणांचे उल्लंघन आहे. असे केले तर ते अँप गुगल प्ले स्टोअर वरून काढले जातात. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पेटीएमवर कारवाई केली गेली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like