Paytm च्या शेअरमध्ये पुन्हा परतली तेजी, आज 4 टक्के वाढ, ‘रेकॉर्ड लो’ पासून 44 % वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Paytm | फिनटेक फर्म Paytm ची पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन्स (One97 Communications) चे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहेत. गुरुवारी, 14 जुलै रोजी, पेटीएमच्या स्टॉकने इंट्राडेमध्ये बीएसईवर 4 टक्क्यांनी उसळी घेतली आणि 739 रुपयांच्या स्तरावर पोहचला. ही तीन महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. गेल्या दोन महिन्यांत स्टॉक 36 टक्क्यांनी वधारला आहे. एवढेच नाही तर पेटीएमचा शेअर आज विक्रमी नीचांकी पातळीपासून 44 टक्क्यांच्या वर ट्रेड करत आहे. (Paytm Share)

 

या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 510.05 रुपये आहे, तर 52 आठवड्यांचा उच्चांक 2,150 रुपये आहे. सध्या शेअरचे प्रमाण 4,099,329 शेअर्सवर दिसत आहे आणि कंपनीचे मार्केट कॅप 47,319 कोटी रुपये आहे.

 

गेल्या 2 महिन्यांत तेजी असूनही बेंचमार्क इंडेक्सच्या तुलनेत गेल्या 6 महिन्यांत पेटीएमची कामगिरी कमकुवत राहिली आहे. गेल्या 6 महिन्यांत शेअर 34 टक्क्यांनी घसरला आहे, तर याच कालावधीत सेन्सेक्स केवळ 12 टक्क्यांनी घसरला आहे.

 

हे आहे तेजीचे कारण
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत पेटीएमचे एकूण ग्रोस मर्केंडाइज व्हॅल्यू (GMV) मजबूत आहे आणि वार्षिक 101 टक्क्यांनी वाढून ती 2.96 लाख कोटी रुपये झाली आहे. (Paytm)

 

एवढेच नाही तर, कंपनीचे सरासरी मंथली ट्रांजक्टिव्ह यूजरमध्येही पहिल्या तिमाहीत 49 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 7.48 कोटी झाली आहे. कर्ज वितरणातही वार्षिक आधारावर 492 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीतील प्रभावी निकालांमुळे पेटीएम स्टॉकवरील गुंतवणूकदारांचा विश्वास परतला आहे.

जेपी मॉर्गनला मजबूत वाढ अपेक्षित
ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने नुकत्याच जारी केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, यापुढे पेटीएमच्या सर्व व्यवसायात आपण मजबूत महसूल वाढ पाहू शकतो. आर्थिक वर्ष 2022-26 या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 40 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

 

चार्ट पॅटर्न काय दर्शवितात?
पेटीएमचा सध्याचा चार्ट पॅटर्न सूचित करतो की जोपर्यंत तो क्लोजिंग आधारावर 674 रुपयांच्या 20डीएमए वर राहील तोपर्यंत स्टॉक तेजीत राहील.
जर हा स्टॉक रु. 674 च्या खाली घसरला, तर त्यासाठी पुढील सपोर्ट 50 डीएमए किंवा रू. 630 स्तर असेल.
विकली चार्ट सूचित करतो की या स्टॉकसाठी वरच्या बाजूला पहिला अडथळा रु.770 वर दिसत आहे.
जर या शेअरने हा अडथळा तोडला तर तो 807 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

 

Web Title :- Paytm | paytm share jumps 36 percent in 2 month share on three month high

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SBI ने ग्राहकांना दिला झटका, MCLR वाढला; कर्ज घेणे होणार महाग, नवीन आणि जुन्या ग्राहकांना फटका

 

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मनपा व खासगी शाळा उद्यापासून (दि.15) नियमित सुरू

 

Jayant Patil | ‘दीपक केसरकर खरे शिवसैनिक नाहीत, सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे दाखवण्यासाठी..’ – जयंत पाटील