PDCC Decision | लाखो शेतकर्‍यांसाठी मोठी खुशबखर ! दिवाळी होणार ‘गोड’, 5 लाखांपर्यंत शून्य टक्क्यांनी कर्ज मिळणार; जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Decision) वतीने शेतकऱ्यांना मोठी दिवाळी भेट (Diwali gift) देण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.30) झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांना यापुढे 5 लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्क्यांनी (five lakhs loans zero percent) देण्याचा मोठा निर्णय (PDCC Decision) घेण्यात आला आहे. तीन लाखांवरील पुढील रकमेचे व्याज बँकेने स्वत:च्या नफ्यातून सोसावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभेत केली. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी दिली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (pune district central cooperative bank) सर्वसाधारण सभा (PDCC General Body Meeting)
रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संस्थांचे प्रतिनिधी, व्यक्ती सभासद सहभागी झाले होते.
सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी बँकेने संस्थांना 8 टक्के दराने लाभांश (Dividend) जाहीर केला.
मागील मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेकडे 11 हजार 329 कोटींच्या ठेवी आहेत. बँकेने 8109 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे.
मागील आर्थिक वर्षात बँकेला 282 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे.
तर निव्वळ नफा (Net profit) 55 कोटी 10 लाख रुपये आहे.
बँकेचा एनपीए (NPA) शून्य टक्के असल्याचे थोरात यांनी सांगितले.

 

अजित पवार यांची ऑनलाइन उपस्थिती

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बँकेच्या सभेला ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले.
सध्या बँकेच्या प्रचलित धोरणानुसार तीन लाख रुपयापर्यंत चे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने सभासद शेतकऱ्यांना दिले जाते.
यापुढे ही मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवावी. तीन लाख रुपयांच्या पुढील रकमेचे व्याज बँकेने सोसावे.
याबाबत सहकार खात्याकडे (co-operative department) रीतसर प्रस्ताव पाठवून मान्यता मिळाल्यानंतर या धोरणाची निश्चिती (PDCC Decision) करावी, अशी सूचना पवार यांनी दिली.

 

Web Title : PDCC Decision | Good news for pune district farmers they will have happy days now they will get loans five lakhs zero percent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Flipkart Big Billion Days Sale | फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलीयन डेज सेल’ मध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी; मिळेल 80 % पर्यंत सवलत

Electricity Bill | ग्रामपंचायतींच्या वीजबिलांची थकबाकी कोटींच्या घरात, न भरल्यास ‘अंधार’

Pune Mayor Muralidhar Mohol | राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवायच ‘सुई’चा पुरवठा बंद, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा ‘पलटवार’