Peas For Diabetes Control | डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे मटार, जाणून घ्या 5 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Peas For Diabetes Control | मटार (Peas) ही अशी भाजी आहे जी बहुतांश लोकांना खायला आवडते. अनेकांना मटार राईस आणि मटार आलू पनीर खायला सर्वाधिक आवडते. वाटाणा हा पोषक तत्वांचा खजिना आहे, ज्यामध्ये Vitamins A, E, C, D मुबलक प्रमाणात असते. मटार खाल्ल्याने रक्तातील साखर (Blood Sugar) आणि कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रणात राहते (Peas For Diabetes Control).

 

मटारमध्ये आयर्न, झिंक, मँगनीज, कॉपर याशिवाय फायबर (Iron, Zinc, Manganese, Copper, Fiber) देखील असते, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवते.

 

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म (Anti-oxidant Properties) असलेल्या मटारमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए (Vitamin A) आढळते, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी प्रभावी (Effective for Improve Eyesight) आहे. आयर्नने समृद्ध मटार शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण (Hemoglobin Level) वाढवण्यास मदत करते. मटार खाल्ल्याने वजनही नियंत्रणात (Weight Control) राहते.

 

मटार खाण्याचे आरोग्यास कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात (Health Benefits of Peas)….

1. मधुमेह नियंत्रणात राहतो (Diabetes Remains Under Control) :
मधुमेही रुग्णांनी (Diabetic Patients) आहारात मटार सेवन (Peas Intake) केल्यास ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित (Controlling Blood Sugar Level) राहते. मटारचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) कमी असतो, ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मटारमध्ये प्रोटीन आणि फायबर असते जे ब्लड शुगर वाढण्यास प्रतिबंध करते. मटारमध्ये आढळणारे व्हिटॅमिन बी, ए, के आणि सी मधुमेहाच्या जोखमीपासून संरक्षण करतात. मधुमेही रुग्णांनी याचे सेवन करावे.

 

2. हाडे मजबूत करते (Strengthens Bones) :
मटार खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. मटारमध्ये व्हिटॅमिन के (Vitamin K) आढळते, ज्यामुळे हाडांचा पोकळपणा कमी होतो आणि हाडे मजबूत होतात.

3. वजन नियंत्रित करते (Weight Control) :
फायबर भरपूर असल्याने मटार वजनही नियंत्रित करते. मटारमध्ये असलेले डायटरी फायबर (Dietary Fiber Foods) पचनास मदत करते आणि वजन नियंत्रणात ठेवते. मटार खाल्ल्यानंतर भूक लवकर लागत नाही आणि शरीराला ऊर्जा मिळते. फायबर पचवण्यासाठी जास्त ऊर्जा वापरली जाते, त्यामुळे जास्त कॅलरीजही बर्न (Calories Burn) होतात आणि वजन नियंत्रित राहते. (Peas For Diabetes Control)

 

4. इम्युनिटी मजबूत राहते (Immunity Remains Strong) :
मटार खाल्ल्याने इम्युनिटी (Immunity) मजबूत राहते. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त मटार शरीराला निरोगी ठेवते. मटारचे सेवन केल्याने वाढत्या वयातील समस्यांचा धोका कमी होतो.

 

5. हृदयविकाराचा धोका टाळते (Heart Attack Prevention) :
मटारमध्ये आढळणारे मॅग्नेशियम (Magnesium), पोटॅशियम (Potassium) आणि कॅल्शियम (Calcium) हृदयाला निरोगी ठेवते.
मटार शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. मटारमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडेंट हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगले मानले जाते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Peas For Diabetes Control | green peas is best vegetables for diabetes control know other benefits also

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

 

Child’s Nutrition Tips | 2 वर्षानंतर पुन्हा शाळेत जात आहेत मुले, ‘या’ 5 टिप्सच्या मदतीने करा त्यांची नवीन लाईफस्टाइल मॅनेज