Budget 2019 : ‘अटल’ पेन्शन योजनेतील पेन्शन रक्कम वाढणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अटल पेन्शन योजनेत अधिक लोकांचा सहभाग वाढावा यासाठी केंद्र सरकार आताच्या अर्थसंकल्पात दोन मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत आहे. असा प्रस्ताव या योजनेचे व्यवस्थापन करणारी संस्था पेंशन फंड रेग्यूलेटरी एंड डेवलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडी) ने अर्थमंत्रालयाकडे केला आहे.

पेन्शनमध्ये होऊ शकते वाढ
पीएफआरडीच्या प्रस्तावानुसार पेन्शन रक्कमेत वाढ आणि वयाच्या अटीत वाढ केली जाऊ शकते. सध्या १८ ते ४० वयोगटातील नागरिकच या योजनेत सहभागी होऊ शकतात. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीएफआरडी वयाची अट ५० वर्ष आणि पेन्शनची रक्कम १०,००० रुपये प्रति महिना करू इच्छित आहे.

काय आहे योजना ?
अटल पेन्शन योजना २०१५ मध्ये सुरु करण्यात आली. योजनेनुसार १८ ते ४० वर्षाच्या कोणत्याही नागरिकाला या योजनेत सहभागी होऊ शकतात. यासाठी ४२ रुपये प्रतिमहिना बचत केली जाऊ शकते. यामध्ये कमीतकमी १००० ते ५००० रुपयांदरम्यान मासिक पेन्शन मिळते.

हा आहे नियम
प्रति महिना ५००० रुपयाच्या पेन्शनसाठी तुम्हाला प्रतिमहिना २१० रुपयांपासून १४५४ रुपयांपर्यंत पैसे जमा करावे लागतील. या दरम्यान त्या व्यक्तीचा आणि पत्नीचा मृत्यू झाल्यास नाव नोंदवलेल्या व्यक्तीला ८,५०,००० रुपयाची रक्कम मिळेल. जर तुम्हाला प्रतिमहिना २००० रुपये पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला प्रतिमहिना ८४ रुपयांपासून ५८२ रुपयांपर्यंत रक्कम भरावी लागेल. या योजनेत कमीतकमी २० वर्षे गुंतवणूक करणे गरजेचे आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी बँकेत एक बचत खाते आणि आधारकार्ड लागेल.