Coronavirus : देशातील नववा बळी ! प.बंगालमधील ‘कोरोना’ग्रस्त 55 वर्षीय रूग्णाचा ‘हार्टअटॅक’नं मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशात कोरोनाने कहर केला आहे. याच कोरोनाने आता देशातील 9 वा बळी घेतला आहे. कोरोनाने देशात आणखी एका व्यक्तीचा जीव घेतला, पश्चिम बंगालमधील 55 वर्षीय एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा जीव गेला आहे. तसेच देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 433 वर पोहोचली आहे.

फक्त 24 तासात देशात कोरोनाचे 50 नवे रुग्ण आढळले आहेत आणि 4 जणांचा मृत्यू झाला. या महामारीमुळे आतापर्यंत देशात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगढ, झारखंड, जम्मू काश्मीर, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, नागालॅंड, अरुणाचल प्रदेशमध्ये कोरोना व्हायरसमुळे 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशच्या 16 जिल्ह्यात 25 मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोनामुळे 3 लोकांचा मृत्यू झाला. आज सकाळी मुंबईत कोरोनाचा 3 रा बळी गेला. ज्या 3 ऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा बळी गेला तो परदेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.