काळ आला होता पण वेळ आली नव्हती ! ‘पाळीव’ टायगरने चित्त्याच्या तावडीतून वाचवले मालकिणीचे प्राण

नवी : दिल्ली वृत्तसंस्था – संकटाच्या काळात कोण कधी धावून येईल याचा काही नेम नाही. असाच काहीसा अनुभव आलाय दार्जिलिंग येथे राहणाऱ्या अरुणा लामा यांना. त्यांनी घरात सोबतीला म्हणून एक कुत्रा पाळला होता. कुत्र्याचे नाव मात्र ‘टायगर’ ठेवले होते.

दार्जिलिंग हा प्रदेश मोठ्या प्रमाणावर खूप सारी झाडं आहेत. जंगलमय निसर्गरम्य भाग असल्यामुळे येथे प्राण्यांचा वावरही मोठ्या प्रमाणावर असतो. अरुणा लामा १४ ऑगस्टच्या दिवशी आपल्या घराच्या तळमजल्यावर होत्या इतक्यात त्यांना दरवाजाबाहेर काहीतरी चमकल्याचे दिसले ते काय होते याबाबत समजन्याआधीच त्यांच्यावर मोठा हल्ला झाला. ती चमकणारा चित्ता होता.

चित्त्याने अरुणा यांच्यावर हल्ला केला होता. घरात टायगर नावाचा पाळीव कुत्रा होता तो चित्त्यावर जोरजोरात भुंकू लागला आणि आक्रमक होऊन त्या कुत्र्याने चित्त्याला पळवून लावले आणि आपल्या मालकिणीचे प्राण वाचवले. याबाबत अरुणा लामा यांच्या मुलीने माहिती दिली आहे.

अरुणा लामा यांचा काळ आला होता पण वेळ थोडक्यात निभावून गेली. घरातील टायगर त्यांच्यासाठी अक्षरशः देवदूत बनून अवतरला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like