इंधन दरात पुन्हा वाढ ! पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आता तर पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात अनुक्रमे २८आणि२९ पैसे प्रतिलिटर वाढवले आहे. त्यामुळे हे दर दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पाेहाेचले आहेत.

मुंबईमध्ये ६ डिसेंबरला पेट्राेलचे दर ९०.०५ रुपये तर डिझेलचे दर ८०.२३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील परभणीत पेट्राेलचे दर सर्वाधिक ९२.१४ रुपये प्रतिलिटरवर पाेहाेचले आहेत. पाेर्ट ब्लेअरला एक लिटर पेट्राेलसाठी सर्वात कमी ७०.२३ रुपये एवढे दर आहेत. त्यामुळे सरकारने इंधन दरवाढीतून दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

लाॅकडाऊनच्या कालावधीत स्थिर राहिलेले पेट्राेल आणि डिझेलचे दर १ जूनपासून वाढण्यास सुरुवात झाली. सरकारने २२ सप्टेंबरपासून पुन्हा दरवाढीला ब्रेक लावला हाेता. २० नाेव्हेंबरला पुन्हा दरवाढ केली हाेती. गेल्या १७ दिवसांमध्ये पेट्राेलचे दर २.३५ रुपयांनी तर डिझेलचे दर ३.१५ रुपयांनी वाढले आहेत. ४ ऑक्टाेबर २०१८ ला मुंबईत पेट्राेलचे दर ९१.३९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर हाेते. त्यावेळी कच्च्या तेलाचे दर ८० डाॅलर्स प्रतिबॅरल एवढे हाेते. आता ते ४८ डाॅलर्स इतके आहेत.

केंद्र सरकारकडून सध्या पेट्राेलवर ३२.९८ रुपये तर डिझेलवर ३१.८३ रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येते. तर महाराष्ट्र सरकारकडून पेट्राेल आणि डिझेलवर अनुक्रमे २६ आणि २४ टक्के व्हॅट आकारला जाताे. त्यावर अनुक्रमे १०.२० रुपये आणि ३ रुपये सेसही घेण्यात येताे.