सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ ! 23 वेळा वाढले पेट्रोल डिझेलचे भाव, जाणून घ्या नवे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel Price | तेल कंपन्यांनी आज सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ (petrol diesel price) केली आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात २८ पैशांनी वाढ करण्यात आली होती. शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचा दर आता १०१.९७ प्रति लिटर झाला आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर आज १०२.३० रुपये लिटर, चेन्नईमध्ये ९७.४३ रुपये, दिल्लीमध्ये ९६.१२ रुपये लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर २३ पैशांनी वाढ झाली आहे. आता डिझेल ९२.६० रुपये लिटर झाले आहे. मुंबईत डिझेलचा दर ९४.३९ रुपये लिटर झाला आहे. चेन्नईत ९१.६४ रुपये, कोलकत्ता ८९.८३ रुपये, दिल्लीत ८६.९८ रुपये लिटर झाला आहे.

४ मे पासून पेट्रोल व डिझेलच्या दरात नियमितपणे वाढ होत आहे. १२ जूनपर्यंत तब्बल २३ वेळा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल व डिझेलचे भाव विक्रमी स्तरावर पोहचले आहेत. ४ मे ते ११ जूनपर्यंत पेट्रोलच्या दरात ५.४५ रुपये लिटर आणि डिझेलच्या दरात ६.०२ रुपये लिटर महागले आहे.

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

Latur News | पावसाळा सुरू झाल्यानंतरही अहमदपूर तालुका तहानलेलाच, 44 गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

मराठा आंदोलनास कारणीभूत ठरलेले ‘कोपर्डी’ पुन्हा चर्चेत

मोदी-ठाकरे, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यासह ‘या’ दिग्गजांच्या भेटीगाठींचा काय आहे अर्थ ? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग

Pune Traffic News | लॉकडाउनचा अंदाज न आल्याने ‘अनलॉक’ नंतर शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीची ‘कोंडी’; पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईनच्या ‘अनियोजित’ कामांचा वाहनचालकांना फटका

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Title : petrol diesel price hike for second day in a row