Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांना दिलासा? ‘या’ कारणामुळे पेट्रोलचे दर 12 रुपयांनी कमी होण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Today | मागील तीन महिन्यांहून जास्त काळ देशात इंधनाच्या दरात (Fuel Price) कोणताही बदल झालेला नाही. काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) खनिज तेलाच्या किमतीमध्ये सतत घट होत आहे. गेल्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेल 25 ते 30 रुपयांनी स्वस्त झाले आहे. कच्चे तेल सध्या प्रति बॅरल 91 डॉलरच्या आसपास आहे. परंतु तरीही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Today) कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्र सरकारने (Central Government) शेवटच्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) कमी केले. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले.

 

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण
ब्रेंट क्रूड ऑइल (Brent Crude Oil) सध्या प्रति बॅरल 90 डॉलरच्या आसपास आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरल 80.85 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. या गुणोत्तराच्या आधारे तेल कंपन्यांनी दर कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर 11 ते 12 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतात.

 

दरम्यान, रविवारी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Today) सारख्याच होत्या. कच्चा तेलाच्या किमती जवळपास आठवडाभरापासून प्रति बॅरल 90 च्या आसपास आहेत. आंतरराष्ट्रीय सत्रावर लंडन ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 91.35 प्रति डॉलर आणि यूएस क्रूड 0.35 टक्क्यांनी वाढून 84.40 प्रति बॅरल होते.

 

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.35 रुपये प्रतिलिटर आहे.
मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्काच्या आधारावर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात.

देशातील प्रमुख चार महानगरांमधील आजचे दर

मुंबई (Mumbai)      :   पेट्रोल -106.3,    डिझेल – 94.27
दिल्ली (Delhi)         :   पेट्रोल – 96.7,     डिझेल – 89.62
कोलकाता (Kolkata) :   पेट्रोल – 106.03,  डिझेल – 92.76
चेन्नई (Chennai)      :   पेट्रोल – 102.63,  डिझेल – 94.24

 

Web Title :- Petrol Diesel Price Today | mumbai delhi rates reduces by 12 rs know todays petrol diesel fuel rates know the petrol diesel price today rates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अश्लिल धंदे करता असे म्हणून तरुणीचा विनयभंग करणार्‍या चेअरमनसह तिघांना अटक

PM Kisan Yojana | पीएम किसानच्या पुढील हप्त्याबाबत आली नवीन अपडेट, कधी येणार तुमच्या खात्यात पैसे?

Flying Bike Video | स्वप्न नाही सत्य, ही आहे जगातील पहिली उडणारी बाईक, टॉप स्पीड- 100 kph