Petrol-Diesel Price Today | कर कपातीनंतरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमधील इंधनाचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | 21 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) इंधनावरील कर कपात करण्यात आली. सरकारने पेट्रोलवर (Petrol) 8 रुपये आणि डिझेलवर (Diesel) 6 रुपयांचं उत्पादन शुल्क कमी केले आहे. त्यानंतर देशात पेट्रोलच्या किमती 9.50 रुपये आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांनी घट झाली. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर (Petrol-Diesel Price Today) असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (मंगळवारी) इंधन दरात कोणताही बदल झाला नाही.

 

केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही (Mahavikas Aghadi Government) राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (VAT) कमी करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने पेट्रोल 2 रुपये 8 पैसे आणि डिझेल 1 रुपये 44 पैसे प्रति लिटर प्रमाणे कपात केली आहे. केंद्र आणि राज्याच्या या निर्णयामुळे जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. या दरम्यान आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहे. (Petrol-Diesel Price Today)

 

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर –

दिल्ली –
पेट्रोल – 96.72 रुपये
डिझेल – 89.62 रुपये

 

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

पुणे –
पेट्रोल – 111.43 रुपये
डिझेल – 95.90 रुपये

 

नाशिक –
पेट्रोल – 111.04 रुपये
डिझेल – 95.52 रुपये

 

नागपूर –
पेट्रोल – 111.08 रुपये
डिझेल – 95.59 रुपये

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.87 रुपये
डिझेल – 96.35 रुपये

 

एसएमएसद्वारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती SMS द्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर SMS करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

 

Web Title :-Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 24 may 2022 maharashtra mumbai pune nagpur nashik and kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा