Pune Crime | जमिनीतून ‘धन’ काढून देण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाकडून महिलेची 9 लाखांची फसवणूक

पुणे / नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जमिनीतून धन काढून देण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबने (Bhondubaba) महिलेला 9 लाख 25 हजार रुपयांचा गंडा (Cheating) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) वारुळवाडी येथे घडला असून नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) आळे येथील भोंदूबाबावर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत 51 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भोंदूबाबा अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार Abdul Salam Abdul Qasim Inamdar (वय-42 रा. साई व्हिला अपार्टमेंट, आळे, ता. जुन्नर) याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कलमा अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल इनामदार याची आणि व महिलेची ओळख झाली होती. आरोपीने मी मांत्रिक बाबा असून माझ्याकडे अदृश्य शक्ती आहेत. त्याद्वारे सर्व घरगुती अडचणी सोडवून घरात शांतता व वैभव नांदेल अशी उपाययोजना करतो. तसेच जमिनीतून धन (Money) काढून देतो अशी बतावणी फिर्यादी महिलेकडे केली. यासाठी खर्च म्हणून आरोपीने फिर्य़ादी यांच्याकडून वेळोवेळी 9 लाख 25 हजार रुपये घेतले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी भोंदूबाबा अब्दुल इनामदार याच्याकडे पैशांची मागणी केली.
मात्र त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली.
तसेच पैसे मागितले तर जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन घर पेटवून देण्याची धमकी दिली.
भोंदूबाबाच्या दहशतीला कंटाळून महिलेने नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 

Web Title :- Pune Crime | woman cheated of rupees 9 lakh 25 thousand by bhondubaba narayangaon junner pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMJJBY And PMSBY | ‘या’ 2 विमा योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या अन्यथा होईल मोठे नुकसान

 

SBI Yono द्वारे आता घरबसल्या मिळेल 35 लाखापर्यंत Personal Loan, या ग्राहकांसाठी विशेष सुविधा

 

Pune NCP | शहराला शिस्त लावत असतानाच शहरातील व्यावसायिक अडचणीत येऊ नयेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन