Petrol-Diesel Prices Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel Prices Today | मागील अनेक दिवसांपासून इंधनाच्या किमतीचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात, कच्च्या तेलाचा दर (Crude Oil Prices) पुन्हा 114 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास पोहोचला आहे. दुसरीकडे सीएनजीच्या दरातही वाढ होत आहे. मात्र, आज (मंगळवार) पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices Today) जारी केले आहेत.

 

क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतींच्या कारणामुळे कंपन्यांवर पुन्हा दबाव वाढू शकतो. या आधीच किमती वाढू शकतात असा अंदाज जाणकारांकडून वर्तवण्यात आला आहे. ब्रेंट क्रूडचा दर वाढल्यास पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्यास सुरू होऊ शकतात. असं सांगण्यात येत आहे. पण, सध्या कच्च्या तेलाचा भाव वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ब्रेंट क्रूडची किंमत सध्या प्रति बॅरल 114 डॉलर आहे  (Petrol-Diesel Prices Today)

 

SMS च्या माध्यमातून जाणून घ्या दर –

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP <स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो.

 

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर –

मुंबई –

पेट्रोल – 120.51 रुपये
डिझेल – 104.77 रुपये

 

दिल्ली –

पेट्रोल – 105.41 रुपये
डिझेल – 96.67 रुपये

 

चेन्नई –

पेट्रोल – 110.85 रुपये
डिझेल -100.94 रुपये

 

कोलकाता –

पेट्रोल – 115.12 रुपये
डिझेल – 99.83 रुपये

 

Web Title :- Petrol Diesel Prices Today | petrol diesel prices today 17 may 2022 know latest rate mumbai delhi and other city

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा