खुशखबर ! पेट्रोल-डिझेलच्या दरात कमालीची घट, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण सुरूच आहे. याचा परिणाम आता थेट घरगुती बाजारामध्ये देखील दिसून आला आहे. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी घसरण पहायला मिळाली आहे. मंगळवारी देखील इंधन दरात घसरण पहायला मिळाली. तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोलच्या दरात 11-12 पैशानी कपात केली आहे आणि डिझेल 13-14 पैशांनी स्वस्त झाले आहे. या कपाती नंतर दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी आत 73.60 रुपये द्यावे लागतील. तसेच एक लिटर डिझेलसाठी 66.58 रुपये खर्च करावे लागतील.

चार प्रमुख शहरांमधील पेट्रोल डिझेलचा दर
इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइटनुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर अनुक्रमे 73.60 रुपये, 79.21 रुपये, 76.22 रुपये आणि 76.44 रुपये प्रति लीटर इतके आहेत. तसेच चारही प्रमुख शहरांमध्ये डिझेलचा दर अनुक्रमे 66.58 रुपये, 69.79 रुपये, 68.94 रुपये आणि 70.33 रुपये प्रति लीटर इतका आहे.

3 महिन्यातील सर्वात मोठी घसरण
चीनमधील कोरोनाव्हायरसमुळे मागणी कमी झाल्यामुळे इंधन दरात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. सोमवारी कच्च्या तेलाची किंमत 3 महिन्यांच्या नीचांकावर गेली. कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आणखी घट नोंदविली जाऊ शकते. मागणी कमी होण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही प्रचंड घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड 0.30 टक्क्यांनी घसरून 59.14 डॉलर प्रति बॅरलवर आला.

कसे ठरतात पेट्रोल डिझेलचे दर
पेट्रोल पंपवरून आपण ज्या किंमतीवर पेट्रोल खरेदी करतो ते मूळ किंमतीच्या 48 टक्के असते. यानंतर बेस किंमतीवर सुमारे 35 टक्के उत्पादन शुल्क, 15 टक्के विक्री कर आणि दोन टक्के कस्टम ड्युटी आकारली जाते.

काय आहे बेस प्राईझ
तेलाच्या किंमतीत कच्च्या तेलाची किंमत (क्रूड), प्रक्रिया शुल्क आणि कच्च्या तेलाला रिफाइन करणाऱ्या रिफायनरीजचे शुल्क यांचा समावेश आहे.

आतापर्यंत इंधनाला GST मध्ये समाविष्ठ केले गेलेले नाही. त्यामुळे यावर एक्साइज ड्यूटी देखील लागते आणि वॅट देखील लागतो.

रोज सकाळी 6 वाजता बदलतात किमती
पेट्रोल डिझेलचे दर रोज कमी जास्त होत राहतात. मात्र याचे नावे दर हे सकाळी सहा वाजता लागू होतात आणि या किमतींमध्ये एक्सइझ ड्युटी, डीलर कमिशन अशा प्रकारच्या सर्व गोष्टी जोडल्यानंतर किंमत दुप्पट वाढतात.

फेसबुक पेज लाईक करा