home page top 1

…तर पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटरच्या वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका आणि इराण या देशांतील तणाव अजूनच तीव्र झाला आहे. इराणने अमेरिकेचे ड्रोन विमान पाडल्यामुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अजून तीव्र झाला आहे. या दोन्ही देशातील संघर्षाचा परिणाम जगभर उमटताना दिसत आहेत. इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत पाच पट्टीने वाढल्या. ही वाढ जानेवारी महिन्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे.

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध झालेच तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्या तेलाचे भाव ९० डॉलर प्रति बॅरेल होऊ शकतात. आता बॅरेलचा भाव ६५ डॉलर प्रति बॅरल इतका आहे. किंमतीत वाढ झाल्यास भारतावर देखील याचा चांगलाच परिणाम होऊ शकतो. एक लिटर पेट्रोलचा भाव वाढून १०० रुपये होऊ शकतो.

इराणच्या रस्त्यातूनच तेलाची आयात करतो भारत

तज्ञांनी सांगितले की, इराण जवळच्या फारस खाडीतून जाणारा जलमार्ग हा जगातील सर्वात महत्वपूर्ण जलमार्ग म्हणून ओळखला जातो. जगभरातील ऊर्जेची आयात निर्यात याच मार्गावरून केली जाते. भारत आपल्याला लागणाऱ्या एकूण तेलापैकी ८० % तेल आयात करतो आणि हे तेल आपण याच मार्गावरून आयात करतो. जर युद्ध झाले तर इराणकडून हा मार्ग बंद करण्यात येईल. यामुळे भारताला तेल आयात करणे देखील महागात पडेल. भारत हा इराणकडून तेल आयात करणारा मोठा ग्राहक आहे.भारत इराणकडून दररोज ४.५ लाख बॅरेल कच्या तेलाची खरेदी करतो. इराणवर जर युद्ध संकट ओढवले तर त्याचा थेट परिणाम भारतावर दिसून येईल. कच्या तेलाची भाववाढ झाल्यास भारतातील पेट्रोल डिझेलचे दर अजूनच वाढतील.

भारत सरकारच्या चिंतेत वाढ, सामाजिक योजनांना बसू शकतो फटका
इराण आणि भारत देशांतील संबंध ताणले गेल्यामुळे कच्या तेलाच्या किंमती चांगल्याच वाढल्या आहेत. या कच्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. यांमुळे भारताने OPEC देशांतील प्रमुख सदस्य सौदी अरेबियाला तेलाच्या किंमती नियंत्रित करायला सांगितल्या आहेत. अशाच प्रकारे कच्या तेलात वाढ होत राहिल्यास भारताला अधिक किमतीने कच्चे तेल खरेदी करावे लागेल. परिणामी कल्याणकारी योजनेवर खर्च होत असलेला पैसा भारताला कमी करावा लागेल.

आरोग्य विषयक वृत्त – 

आहारा संबंधीचे काही ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या ‘सत्य’

मसाल्याचे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक, होतात अनेक फायदे

स्लीम व्हायचंय का ? या उपायांनी सहज कमी होईल पोट

‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही

Loading...
You might also like