नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक एफडी, रिकरिंग डिपॉझिट, गोल्ड, शेयर Shares , म्यूच्युअल फंड सारख्या अनेक ठिकाणी आपण गुंतवणूक Investment करतो. परंतु जेव्हा आपण प्रायव्हेट किंवा सरकारी उपक्रमांमध्ये नोकरीला असतो तेव्हा तिथे पीएफ PF कपात केली जाते.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
आज आम्ही याच पीएफ कपातीबाबत सांगणार आहोत. पीएफसुद्धा एक बचत योजना आहे, जी कर्मचार्यांच्या भविष्यासाठी बनवण्यात आली आहे. यामध्ये पेन्शनसह रिटायर्मेंटमध्ये लमसम अमाऊंट (Lumsum Amount) मिळते. इतकेच नव्हे तर जास्त व्याज आणि विम्याची सुविधा मिळते. सोप्या प्रश्नोत्तराद्वारे पीएफची संपूर्ण एबीसीडी जाणून घेवूयात…
ईपीएफ म्हणजे काय ?
– कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) एक बचत योजना आहे, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा, 1952 च्या अंतर्गत सुरू करण्यात आली होती. ती केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून मॅनेज केली जाते, ज्यामध्ये सरकार, कंपनी आणि कर्मचार्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी असते. ईपीएफओ या बोर्डाच्या कामामध्ये मदत करते.
पीएफचा PF नियम काय आहे ?
– कंपनी आणि कर्मचारी एक ठराविक अंशदान पीएफ अकाऊंटमध्ये PF Account करतात. आणि यावर ईपीएफओ वार्षिक व्याज देते. सोबतच कर्मचार्यांना पेन्शन सुविधा सुद्धा मिळते.
ईपीएफचा 2020-21 मध्ये व्याजदर किती आहे ?
– पीएफवर व्याजदरात वार्षिक मुल्यांकन केले जाते. 2020-21 साठी ईपीएफ व्याजदर 8.50% आहे.
पीएफ PF कॉन्ट्रीब्यूशनची गणना कशी होते ?
– सामान्यपणे ईपीएफमध्ये एप्म्लॉयर आणि एम्प्लॉई दोघांकडून योगदान, कर्मचार्याची बेसिक सॅलरी+डीएच्या 12-12 टक्के आहे, म्हणजे एकुण 24 टक्के.
एम्प्लॉयर 12 टक्के योगदानपैकी 8.33 टक्के एम्प्लाई पेन्शन स्कीम (ईपीएस) मध्ये आणि बाकी 3.67 टक्केची रक्कम ईपीएफमध्ये जाते.
10% ईपीएफ शेयर त्या संघटना/ कंपन्यांसाठी व्हॅलिड आहे जिथे 20 पेक्षा कमी कर्मचारी आहेत.
किंवा संघटना/ कंपन्या ज्यांचे नुकसान (फायनान्शियल वर्षाच्या अखेरीस) त्यांच्या एकुण संपत्तीच्या बरोबर किंवा जास्त झाले आहे.
आणि त्यांना औद्योगिक आणि फायनान्शियल रिझॉल्यूशन बोर्डद्वारे आजारी (Sick) घोषित केले आहे.
–
15 हजार रुपयांपेक्षा जास्त सॅलरीवर पीएफ मॅनडेटरी आहे का ?
– होय, परंतु कंपनी आणि कर्मचार्यांना हवे असल्यास ते पीएफ कॉन्ट्रीब्यूशन 15000 रुपयांच्या वेतनच्या लिमिटवर ठेवू शकतात. कर्मचारी आपले 12 टक्के पेक्षा सुद्धा योगदान वाढवू शकतात. यासाठी वॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (व्हीपीएफ) चा पर्याय आहे, जे 12 टक्केच्या वरील योगदान म्हटले जाते. व्हीपीएफ अंतर्गत कर्मचारी पीएफमध्ये आपल्या बेसिक सॅलरीच्या 100 टक्केपर्यंत योगदान करू शकतात.
सॅलरीसाठी पीएफचे सध्याचे लिमिट काय आहे ?
– पीएफचे PF लिमिट सॅलरीसाठी 12 टक्केच आहे.
परंतु जर वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा जास्त अंशदान असेल तर त्यातून मिळणारे व्याज उत्पन्न टॅक्सच्या कक्षेत येईल.
टॅक्स देऊन कर्मचारी आपल्या वेतनाच्या हवे तेवढे अंशदान जमा करू शकतात.
पीएफ ग्रोस सॅलरीवर कॅलक्युलेट होते का ?
– टॅक्स न कापता जो मुळ पगार आणि भत्ते जोडून पगार होतो त्यास ग्रोस सॅलरी म्हणतात.
यामध्ये बोनस, ओव्हर टाईम पे, हॉलिडे पे आणि इतर भत्ते असतात.
यावर पीएफ कॅलक्युलेट होत नाही. पीएफ मुळ पगारावर कापला जातो.
पीएफ PF अकाऊंटवर इश्युरन्सची सुविधा आहे का?
– ईपीएफ मेंबर्सला इन्श्युरन्स कव्हरची Insurance Cover सुविधा एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम (EDLI Insurance cover) च्या अंतर्गत मिळते.
स्कीममध्ये नॉमिनीला कमाल 7 लाख रुपयांचे इन्श्युरन्स कव्हर अंतर्गत पैसे पैसे दिले जातात.
–
पीएफसाठी किती कर्मचारी असणे आवश्यक आहे ?
– ज्या संस्थेत/कंपनीत किमान 20 लोक काम करत आहेत, ती संस्था कामगारांना ईपीएफ लाभ देण्यासाठी उत्तरदायी आहे.
ज्या संघटनेत अथवा फर्ममध्ये कामगारांची संख्या कमाल 19 असेल तरी कॉन्ट्रीब्यूशन 10 टक्के राहू शकते.
पीएफ अमाऊंटची 100 टक्के रक्कम विदड्रॉल करता येऊ शकते का ?
– रिटायर्मेंटनंतर किंवा दोन महिन्यांच्या लागोपाठ बेरोजगारीनंतरच पूर्ण रक्कम काढता येऊ शकते. नवीन नियमानुसार ईपीएफओ बेरोजगारीच्या 1 महिन्यानंतर पीएफ रक्कमेतून 75% रक्कम काढण्याची परवानगी देते.
लागोपाठ 2 महिने बेरोजगार राहिल्यास, तुम्ही उर्वरित 25% फंड सुद्धा काढू शकता.
या दरम्यान जर नवीन नोकरी मिळाली तर उर्वरित शेष 25% रक्कम एक नवीन खात्यात ट्रान्सफर केली जाऊ शकते.
पीएफ नियमात फॉर्म 31 काय आहे ?
– ईपीएफ फॉर्म 31 चा वापर तुमच्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी केला जातो.
मात्र, पीएफ खात्यातून रिटायर्मेंटच्या पूर्वी रक्कम काढण्याची परवानगी केवळ काही विशिष्ट स्थितीत जसे की, घर खरेदी/ बांधकाम, होम लोन चुकवणे, मेडिकल इमर्जन्सी, मुलांचे लग्न/ किंवा मुले/भाऊ यांचे शिक्षण.
Wab Title : PF saving scheme not only high interest on pf account insurance is also available know full abcd of pf
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल
Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा