Phone Tapping Case | ‘संजय राऊत आणि खडसेंचा फोन टॅप झाल्याचं महाराष्ट्राच्या समोर आलं आहे, तत्कालीन मुख्यमंत्र्यांची चौकशी करावी’ – अमोल मिटकरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Phone Tapping Case | राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक प्रकरणावरून आरोप – प्रत्यारोप करत आहेत. मात्र फोन टॅपिंग प्रकरणामुळे (Phone Tapping Case) पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे फोन टॅप झाल्याचा गुन्हा कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये (Colaba Police Station) दाखल करण्यात आला आहे.

 

2019 मध्ये संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन दोन महिने टॅपिंगसाठी (Phone Tapping Case) लावण्यात आल्याचं अतिरिक्त आयुक्तांनी (Additional Police Commissioner) तक्रारीत म्हटलं आहे.
राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप (Allegations) रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे.

यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (NCP)
नेते आणि आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांच्यावर निशाणा साधला आहे.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी खासदार संजय राऊत आणि एकनाथराव खडसे साहेब यांचे फोन टॅप केले हे महाराष्ट्राच्या समोर आले आहे.
अशा अधिकाऱ्यांना दोनच व्यक्ती आदेश देऊ शकतात एक मुख्यमंत्री (CM) दुसरे गृहमंत्री ही खाती ज्यांच्याकडे होती त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

 

दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केले ते भाजप (BJP) सरकारच्या काळात केले होते.
महाविकास आघाडी सरकार (MVA Government) काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Phone Tapping Case | It has come to the notice of Maharashtra that Sanjay Raut and
Eknath Khadse s phone was tapped then Former Chief Minister Devendra Fadnavis should be questioned Amol Mitkari

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा