तक्रारदार महिलेची छेडछाड करणारा सहायक फौजदार निलंबीत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पती-पत्नीच्या भांडणाची तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेलेल्या महिलेच्या खंद्यावर हात ठेवून, महिला घरी गेली असताना तिला फोन करुन छेडछाड करणाऱ्या सहायक फौजदारास पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी तडकाफडकी निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकार साने चौकीत बुधवारी घडला आहे.

पुणे/पिंपरी : सहाय्यक पोलीस फौजदाराकडून (ASI) महिलेचा विनयभंग

या प्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर चिखली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या साने चौकीतील सहायक फौजदार रामनाथ पालवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तक्रारदार महिला एका राजकीय पक्षाची पदाधिकारी आहे. तिचे पतीबरोबर भांडण झाले होते. त्यामुळे ही महिला चिखली पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या साने चौकीत स्वतःच्या मुलाला घेऊन तक्रार देण्यासाठी गेली होती. सहाय्यक फौजदार पालवे याने त्या महिलेची त्यावेळेस जुजबी तक्रार घेतली. त्यानंतर रात्री उशिरा या महिलेच्या मोबाईलवर आरोपी सहाय्यक फौजदाराने कॉल करून अश्लील बोलून महिलेचा विनयभंग केला.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fe963a6e-cec4-11e8-a0b5-39ed882eb96a’]
संबंधित महिला आणि राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुगळीकर यांनी संबंधित सहायक फौजदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सहायक फौजदार पालवे याच्यावर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छेडछाड करणाऱ्या पालवे याला पोलीस आयुक्तानी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.