कंपनीत पाणी पुरवठा ; एकावर खूनी हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – कंपन्या तसेच सोसायट्यांमधील कामे मिळवण्यासाठी असणारी स्पर्धा जीवघेणी ठरु लागली आहे. हिंजवडी येथील एका मोठ्या खासगी कंपनीत पाणी पुरवण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एकावर तलवारीने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 18) सायंकाळी सातच्या सुमारास हिंजवडी फेज दोन येथे घडली.

गोरख राजाराम ओझरकर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ राजाराम ओझरकर (39, रा. माण ओझरकरवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विशाल ओझरकर, राहुल ओझरकर, योगेश ओझरकर (सर्व रा. माण ओझरकरवाडी, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून हिंजवडी परिसरातील कंपनीत विकत पाणी पुरविण्याच्या कारणावरून फिर्यादी नवनाथ यांचे भाऊ गोरख यांच्यावर तलवारीने वार करून खुनी हल्ला केला. यामध्ये गोरख यांच्या डोक्यात, हातावर गंभीर दुखापत झाली. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like