Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : पुस्तक विक्री करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Cheating Fraud Case | भोसरी येथील एस.पी.जी. इंटरनॅशन शाळेला (SPG International School) पुस्तक विक्री करताना पुस्तक कंपनीच्या कर्मचाऱ्याने पुस्तक विक्रीत अफरातफर करुन दोन लाखांची फसवणूक केली. ही घटना 31 मार्च 2023 रोजी भोसरी (Bhosari) येथे घडली आहे. (Pimpri Cheating Fraud Case)

याप्रकरणी स्वरुप सरोज मुखर्जी (वय 38 रा. बावधन) यांनी मंगळवारी (दि.16) भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून कय्यूम अब्दुल चौघुले (रा. ए.के. प्लाझा, रायगड) याच्यावर आयपीसी 420,408 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौघुले हा गुरुग्राम दिल्ली येथील प्रोलियम लर्निंग सोल्युशन प्रा. लि. या कंपनीत नोकरीला होता. या कंपनीमार्फत आळंदी रोड वरील एस.पी.जी. इंटरनॅशनल स्कुल येथे 5 लाख 34 हजार 620 रुपयांच्या पुस्तकांची विक्री केली. पुस्तक विक्री करुन प्राप्त झालेली संपूर्ण रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा केली नाही. आरोपीने केवळ 3 लाख 36 हजार 620 कंपनीची 1 लाख 98 हजार रुपयांची फसणूक केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आईस्क्रीम कंपनीची फ्रांचायसी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

सांगवी : मेरीडीयन आईस्क्रीमची फ्रेन्चाईजी देण्याचे आमिष दाखवुन
तरुणाची दोन लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी तेजस रविकांत देशपांडे (वय-25 रा. पिंपळे गुरव) याने
सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निलेश अशोक चव्हाण (रा. सिंहगड रोड),
अशोक चव्हाण (रा. नांदेड फाडा, सिंहगड रोड, पुणे) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार
गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस (Sangvi Police) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार