Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : कार स्वस्तात देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Cheating Fraud Case | शोरुमपेक्षा कमी किंमतीमध्ये व लवकर कार देतो म्हणत एका व्यावसायिकाची साडे दहा लाखांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 2 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत काळेवाडी फाटा (Kalewadi Phata) येथील ड्रिम कार येथे घडला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

याबाबत शंकर दिलीप गायकवाड (वय-29 रा. ममता नगर, जुनी सांगवी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अजिक कुळाल, सौरभ उर्फ संदिप सुनिल काकडे (वय-35 रा. गणेशखिंड रोड, औंध), शुभम मनाळकर, विकास राठोड, मयुरी व इतरांवर आयपीसी 406, 409, 420, 468, 471, 120 (ब), 34 नुसार गुन्हा दाखल केला असून सौरभ उर्फ संदिप काकडे याला अटक केली आहे. (Pimpri Cheating Fraud Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यीदी शंकर गायकवाड यांचा टूर्स अॅन्ड ट्रॅव्हलर चा व्यवसाय आहे. आरोपींनी कट करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्याद यांना इर्टींगा कार शोरुम किमती पेक्षा कमी किंमतीत व लवकर मिळवून देतो असे आमिष दाखवले. यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 10 लाख 50 हजार 843 रुपये घेतले. मात्र त्यांना कार दिली नाही.

तसेच पैसे परत मागितले असता फिर्यादी यांचा मित्र अमोल काळे यांच्या मोबाईलवर पैसे परत
पाठवल्याचा खोटा मेसेज पाठवत त्याचा स्क्रीन शॉट फिर्यादी यांना पाठवून त्यांची फसणूक केली.
आरोपींनी स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता फिर्यादी यांनी दिलेल्या रक्कमेचा अपहार करुन फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावर्डे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात