Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2006 नवीन रुग्ण, 2482 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृतांची संख्या अधिक असल्याने चिंता कायम आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात 2006 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2482 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2006 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 10 हजार 423 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2482 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 1 लाख 85 हजार 568 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 21 हजार 927 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 87 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 46 रुग्ण शहरातील आहेत. तर 41 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4365 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2926 तर हद्दीबाहेरील 1439 रुग्णांचा समावेश आहे. शहरामध्ये हद्दीबाहेरील 2251 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर शहरातील 282 रुग्णांवर पुण्यात उपचार सुरु आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपळे सौदागर, चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, चिखली, पिंपळे गुरव, संत तुकारामनगर, यमुनानगर, किवळे, भोसरी, काळेवाडी, मोशी खराळवाडी, दापोडी, वाकड, रहाटणी चऱ्होली, तळवडे, सांगवी, बोपोडी, पुणे, जुन्नर, आळंदी, माण, मांजरी, अव्हाडवाडी, हाडपसर, कात्रज, अहमदनगर, वडगाव शेरी, मुंबई, खेड, पाषाण, विमाननगर, बावधण, बालेवाडी, धानोरी येथील रहिवाशी आहेत.