Coronavirus in Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा ! शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन हजारांच्या आत, दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने शहरामध्ये लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. याशिवाय रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच अ‍ॅक्टिव्ह (Active) रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड Pimpri Chinchwad शहरामध्ये 270 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 270 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 52 हजार 237 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 273 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 45 हजार 082 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
शहरामध्ये सध्या 2 हजार 992 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 12 रुग्ण शहरातील आहेत. तर 07 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Also Read This : 

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस मनिषा पोले यांनी दिलं त्यांना मिष्ठान्न भोजन