Coronavirus in Pimpri : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, 279 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. शहरात आज नविन रुग्णांची (New patient) संख्या दोनशेच्या आत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad City) 185 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 05 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये (PCMC City) 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department of Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 185 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 57 हजार 288 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 279 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 51 हजार 810 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 119 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 05 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 03 रुग्ण शहरातील आहेत. तर 02 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि.28) शहरामध्ये 73 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 15 खासगी लसीकरण केंद्रावर (Private Vaccination Center) लसीकरण (Vaccination) करण्यात आले. आज दिवसभरात 18 हजार 450 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 6 लाख 29 हजार 620 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Titel :- pimpri chinchwad coronavirus news updates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक