Coronavirus : गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 69 नवे पॉझिटिव्ह तर 50 जणांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 69 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 50 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (सोमवार) शहरामध्ये दोन कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 69 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 391 वर पोहचली आहे. आज 50 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 96 हजार 619 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरात 2568 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1809 शहरातील तर 759 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 602 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 92 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 98 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.