Coronavirus : टेन्शन वाढलं ! पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे ॲक्टिव्ह रुग्ण वाढले, दिवसभरात 298 नवीन रुग्ण

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शहरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 298 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 58 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) शहरामध्ये एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 298 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 198 वर पोहचली आहे. आज 58 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 98 हजार 257 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटले असले तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

गेल्या 24 तासामध्ये पालिका एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण चाकण येथील आहेत. आतापर्यंत शहरात 2602 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1830 शहरातील तर 772 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 952 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 118 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 121 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.