Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 633 नवीन रुग्ण, 285 जणांना डिस्चार्ज

ADV

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असताना पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 633 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात 285 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (बुधवार) शहरामध्ये 2 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1
लाख 10 हजार 703 वर पोहचली आहे. तर 1 लाख 3 हजार 517 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ADV

गेल्या 24 तासामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण भोसरी, मोशी येथील आहे. आतापर्यंत शहरात 2648 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1863 शहरातील तर 785 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1 हजार 299 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.