Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 1052 नवीन रुग्ण तर 15 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. शहरामध्ये आज दिवसभरात 1052 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर आज दिवसभरात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 642 वर पोहचली आहे. रुग्ण वाढत असताना शहरातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहरामध्ये सहा हजाराच्यावर रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 1052 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 31 हजार 643 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 1052 रुग्णांपैकी 1024 हे शहरातील आहेत. तर 28 रुग्ण शहारा बाहेरील असून शहराबाहेरील 465 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 65 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील मृतांचा आकडा 642 वर पोहचला आहे. यामध्ये 525 रुग्ण शहरातील तर 117 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 207 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 22005 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 6130 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये भोसरी, रहाटणी, आकुर्डी, थेरगाव, कासारवाडी, मोरेवस्ती चिखली, निगडी प्राधिकरण, जाधववाडी, नेहरूनगर, चऱ्होली फाटा, चिंचवड, काळेवाडी येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like