Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 557 नवीन रुग्ण, 9 जणाचा मृत्यू तर 281 रुग्ण झाले बरे

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरामध्ये 557 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाच दिवशी कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 281 रुग्णांची कोरोनाच्या दुसऱ्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील रुग्ण संख्येने 8 हजाराचा टप्पा पार केला आहे.

शहरामध्ये आज दिवसभरात 557 नवीन रुग्ण आढळून आले असून शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8171 इतकी झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी 22 रुग्ण हद्दी बाहेरील असून त्यांच्यासह 242 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरातील 14 जणांवर पुण्यात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. शहरात दिवसभरात 281 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 4879 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरामध्ये सध्या 1942 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9 आणि शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील 129 तर शहराबाहेरील 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरात एकूण 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज शहरामध्ये थेरगाव, भोसरी, कासारवाडी, चिखली, चिंचवड, मोशी, नेहरुनगर, तळवडे, आनंदनगर, तळेगांव रोड, पुणे येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.