धक्कादायक ! अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने सपासप वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने एका ५८ वर्षीय व्यक्तीवर सराईताने कोयत्याने सपासप वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाकड येथे समोर आली आहे.

शिवमुर्ती एकनाथ जाकते हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर याप्रकरणी सराईथ गुन्हेगार विकी उर्फ विकास अडागळे याच्यावर गन्हा दाखल करण्यात आला आहे.

असं घडलं ?

शिवमुर्ती जाकते हे त्यांच्या घरासमोरील दुकानाशेजारी झोपले होते. तेव्हा मध्यरात्री अचानक विकी अडागळे तेथे आला. त्याने शिवमुर्ती यांच्या अंगावर लघुशंका केली. त्याचा जाब शिवमुर्ती यांनी त्याला विचारला. त्याच्या रागातून त्याने तुला तर आता संपवून टाकतो म्हणत शिवमुर्ती यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या हातावर, डोक्यात कोयत्याने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी त्यांचा मुलगा किरण जाकते याने फिर्याद दिली.

आरोग्यविषयक वृत्त-

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन