पिंपरीच्या महापौरांकडून अप्रत्यक्षपणे राम कदमांचं समर्थन

ADV
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

दहीहंडी कार्यक्रमामध्ये घाटकोपर येथील भाजपाचे आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याचे पडसाद पिंपरी चिंचवड महापालिका आज गुरुवारी सभागृहात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी राम कदम यांच्या निषेधाच्या मागणी करत चांगलाच गोंधळ घातला. यावेळी महापौर राहुल जाधव यांनी ही निषेधाची मागणी सभागृहात करू नये, विषय पत्रिकेवर चर्चा सुरु करण्याचे आदेश दिल्याने आणखी गोंधळ वाढला. आज सभागृहात विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी अज्ञानी म्हटल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी कपाळाला काळ्या फिती बांधून सभागृहात आले आहेत.
जाहिरात
शिवसेनेच्या नगरसेविका मिनल यादव यांनी सुरूवातीलाच राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. कदम यांच्यावर  सभागृहाच्यावतीने निषेध करण्याची त्यांनी मागणी केली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली घोडेकर यांनी राम कदम यांच्या प्रवृत्तीचा धिक्कार व्यक्त करत निषेधाचा ठराव सभागृहात मांडला. मात्र त्यावरून सभागृहात एकच गोंधळ उडाला. महापौर राहुल जाधव यांना ही निषेधाची मागणी सभागृहात करू नये असे वक्तव्य केले. त्यावरून विरोधकांनी महापौरांच्या डायसवर धाव घेतली.
[amazon_link asins=’B078TL3KR6,B075GDCBX6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9c604457-b1bd-11e8-a575-877b4b47bc50′]