Pimpri Chinchwad Murder Case | पिंपरी : डोक्यात बॅट मारुन तरुणाचा खून, चार जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Murder Case | मारहाण का केली अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोघांना चार जणांच्या टोळक्याने लाकडी बांबू व बॅटने मारहाण केली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला (Murder Case) असून अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.24) रात्री दहाच्या सुमारास आकुर्डी परिसरातील पांढरकर वस्ती येथे घडला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police Station)चार जणांना अटक केली आहे.

अली तय्यब सय्यद (वय-20 रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने मंगळवारी (दि.27) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन नौशात हकीबुल्ला साह (वय-21), मोहमंद मुबीन हकीबुल्ला साह (वय-18), शमीम हकीबुल्ला साह उर्फ पुल्लु (वय-27), सुजीत सुभाष पाल (वय-18 सर्व रा. पांढारकर वस्ती, आकुर्डी) यांच्यावर आयपीसी 302, 324, 323, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pimpri Chinchwad Murder Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नौशाद व मोहमंद यांनी फिर्य़ादी व मृत अली यांना मारहाण केली होती.
याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व अली आरोपी नौशाद याच्याकडे गेले होते.
त्यावेळी आरोपींनी दोघांना लाकडी बांबुने मारहाण केली. तर शमीम याने त्याच्याकडे असेल्या लाकडी बॅटने मारहाण केली.
तर सुजीत याने हाताने व पायाने मारहाण करुन जखमी केली.
आरोपी शमीम याने फिर्यादी यांचा मित्र अली याच्या डोक्यात जोरात बॅट मारली.
यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर उपचार सुरु असताना अली सय्यद याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | पार्कींग केलेल्या रिक्षांचे डिस्कटायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांकडून अटक

Manoj Jarange Patil On Maharashtra Govt | ‘सरकारने शिष्टमंडळ पाठवून फसवणूक केली, महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू’ – मनोज जरांगे

PM Modi Yavatmal Visit | PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘या’ जिल्ह्यात महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम, PM Kisan च्या १६ व्या हप्त्याचे वितरण करणार

Amit Shah On Uddhav Thackeray | अमित शाह यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते…

Sanjay Raut On Amit Shah | अमित शहांच्या घराणेशाहीच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर, ”जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का?”