Pimpri : सराईत गुन्हेगार मित्राचा कोयत्याने वार करुन खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – दिघी रस्ता, भोसरी येथे दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रांनीच सराईत गुन्हेगार मित्राचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री घडली आहे. भोसरी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
मयूर मडके (26, रा. मरकळ रोड, आळंदी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगारचे नाव आहे. मडके याच्यावर दिघी, आळंदी, भोसरी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मयूर आणि आरोपी हे एकमेकांचे जिगरी मित्र आहेत. शनिवारी रात्री मयूर आणि त्याचे दोन आरोपी मित्र दिघी रोडवर दारू प्यायला बसले. त्यानंतर आणखी काही मित्र दारू पिऊन तिथे आले. किरकोळ कारणांवरून त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून आरोपींनी मयूर याच्यावर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या मयूरचा मृत्यू झाला. भोसरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like