Pimpri Chinchwad-PCMC News | कार्यशाळेस दांडी मारणे पीसीएमसीतील पदाधिकाऱ्यांना पडले महागात; थेट कारवाईचा इशारा

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवडचे (Pimpri Chinchwad-PCMC News) आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad-PCMC News) ११ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या जनजागृती कार्यशाळेला आणि बैठकांना दांडी मारणाऱ्या ७ उपायुक्त, ३ सहायक आयुक्त तसेच एका क्षेत्रीय अधिकाऱ्याला यासंबंधी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

 

यात एलबीटी विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे, उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, भांडार विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर, शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत, आकाश चिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्यासह भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक उपायुक्त प्रशांत जोशी करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त इलेश देशमुख झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या सहायक आयुक्त सुषमा शिंदे, तर महफ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी विजयकुमार थोरात यांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Pimpri Chinchwad-PCMC News)

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे.
त्यानुसार आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ह्युमन मॅट्रिक्स सिक्युरिटीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.
हा कार्यक्रम 29 नोव्हेंबरला सकाळी नऊ ते दोनच्या वेळेत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर हॉटेलमध्ये आयोजित केला होता.
या कार्यशाळेला सर्व विभागाच्या प्रमुखांनी उपस्थित राहण्याबाबतचे आदेश स्वच्छ महाराष्ट्र अंमलबजावणी कक्षाने 28 नोव्हेंबरला दिले होते.
त्यामुळे कार्यक्रमाला सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक होते. कार्यक्रमाला अनुपस्थित राहून पदाधिकाऱ्यांनी कार्यालयीन शिस्तभंग केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून कार्यालयीन सुसूत्रतेच्या दृष्टीने उचित नाही. तुमच्यावर तरतुदीनुसार कारवाई का होऊ नये? याचा खुलासा दोन दिवसांत सादर करावा. असे न केल्यास कारवाई केली जाईल, अशा स्वरूपाचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

 

Web Title :- Pimpri Chinchwad-PCMC News | pcmc commissioners notice to 11 officers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या