दिल्लीत फोटोवाला खासदार आणि गल्लीत प्रसिद्धीसाठी बैठकांचा जोर; आ. जगताप यांचे खा. बारणे यांच्यावर टिकास्त्र

पिंपरी-चिंचवड :  पोलीसनामा ऑनलाईन

शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढे येण्याचे आणि अतिक्रमण कारवाईला थेरगावपासूनच सुरूवात करण्याचे आवाहन केले होते. परंतु, दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात “फोटो काढणारा खासदार” म्हणून ओळख असलेले शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे या आवाहनामुळे प्रचंड चिडल्याचे दिसत आहे. आम्ही चांगल्या कामासाठी पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी “फोटोवाल्या खासदारा”ने चांगल्या आवाहनाचेही राजकीय भांडवल करून पुन्हा प्रसिद्धी मिळवण्याची पुरेपूर संधी साधली आहे. महापालिका निवडणुकीत अवघे दोन नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय पात्रता असलेल्या बारणे यांना दिल्लीपेक्षा गल्लीतच जास्त रस असल्याचे त्यावरून सिद्ध होते,अशी घणाघाती टिका भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमधील रस्ते मोठे आणि प्रशस्त आहेत. तरीही शहरातील बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, हे वास्तव आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासन आपल्या स्तरावरून कारवाई करत असते. परंतु, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पुढे येण्याचे आवाहन केले होते. तसेच विकासाची दूरदृष्टी असेल, तर ते स्वतः राहत असलेल्या थेरगाव परिसराचा विकास करण्याचे आव्हानही आपण दिले होते. नागरिकांच्या प्रश्नांचा खूपच कळवळा असल्यासारखे वागणाऱ्या बारणे यांनी हे आव्हान स्वीकारून पुढे येत अतिक्रमणांवर कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढाकार घेतील, अशी शहरातील जनतेची अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांनी आमच्या आवाहनाचेही राजकीय भांडवल करून प्रसिद्धी मिळवलीच.

[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b930fe87-aaad-11e8-91f0-db95f67f9440′]

खासदार बारणे यांनी दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात “फोटोवाला खासदार” म्हणून राजकीय ओळख प्राप्त केली आहे. पंतप्रधानांपासून ते अनेक केंद्रिय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे जायचे आणि एखादे निवेदन देऊन त्यांच्यासोबत फोटोसेशन करायचे. त्यानंतर त्याची भरपूर प्रसिद्धी मिळवायची आणि प्रत्यक्षात प्रश्न मात्र“जैसे-थे” ठेवायचे, हीच त्यांची राजकीय पद्धत राहिली आहे. मोदी लाटेच्या कृपेमुळे खासदारकीची लॉटरी लागली. त्याचा उपयोग केंद्राशी संबंधित जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना करता आला नाही. ऊठसूठ महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यावरून हे स्पष्ट होते. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या सात-आठ महिन्यांवर आल्यामुळे केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या रेडझोनसह अन्य प्रश्नांवर लोकांना काय उत्तर द्यायचे?, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे दिल्लीतल्या नेत्यांसोबत फोटोसेशन केल्यानंतर आता गल्लीतील गोष्टींवरून ते प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी धडपडत आहेत.

‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’; दिल्लीत या होर्डिंग्जमुळे राजकीय खळबळ

महापालिकेत खाबुगिरी असेल, तर चारवेळा नगरसेवक राहिलेल्या खासदार बारणे यांनी त्याचे पुरावे द्यायला कोणी अडविले आहे. मोघम आरोप करून आपण खरोखरच “फोटोवाला खासदार” असल्याचे ते स्वतःहून जनतेसमोर सिद्ध करत आहेत. या “फोटोवाल्या खासदारा”ला ते स्वतः राहत असलेल्या थेरगाव भागातून महापालिका निवडणुकीत अवघे दोन नगरसेवक निवडून आणता आले आहेत. खासदार झाल्यानंतर त्यांनी केवढी मोठी राजकीय उंची गाठली आहे, हे यावरून स्पष्ट होते. याच राजकीय कतृत्वाच्या जोरावर आपण २०१९ ला पुन्हा खासदार होण्याची वल्गना त्यांनी जरूर कराव्यात. परंतु, “फोटोवाला खासदार”हवा की दिल्लीतील प्रश्न सोडवणारा खासदार हवा, हे पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ जनतेला आता चांगलेच कळून चुकले आहे, अशी बोचरी टिका त्यांनी केली आहे.”

You might also like