Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 123 नवीन रुग्ण, 142 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Chinchwad Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड ((Pimpri Chinchwad Corona)) शहरामध्ये 123 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 123 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 112 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 60 हजार 939 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 812 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यामध्ये 02 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4361 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी (दि.9) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 4 हजार 152 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 11 लाख 72 हजार 189 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona | 123 new corona patients discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours, 142 discharged

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM-Kisan | मोठी खुशखबर ! 9.5 शेतकर्‍यांच्या खात्यात आला 9वा हप्ता, चेक करा तुमच्या अकाऊंटमध्ये आलेले पैसा?

MP Chhatrapati Sambhaji Raje | ‘दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण…,’ खा. संभाजीराजे भडकले (व्हिडीओ)

Pune Crime | जिल्हा न्यायालयाकडून अ‍ॅड. सागर ऊर्फ राजाभाऊ सुर्यवंशी फरार घोषित