Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 149 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या वाढत असताना ओमिक्रॉनचे रुग्ण वढल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याने शहरातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या पाचशेच्या आसपास पोहोचली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 149 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 271 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 149 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 572 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 133 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 293 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे. (Pimpri Corona)

 

शहरामध्ये सध्या 484 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 241 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 243 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Web Title :- Pimpri Corona | 149 Corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 444 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Mayor Muralidhar Mohol | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा पुन्हा बंद, पुण्यातील शाळांबाबत महापौरांनी सांगितलं…

 

Ajit Pawar | कोरोनाची रूग्ण संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

Sleeping On Stomach | तुमच्या मुलांना देखील आहे पोटावर झोपून वाचण्याची आणि खेळण्याची सवय? सावधान, नंतर होऊ शकतात ‘या’ 5 गंभीर समस्या…