ताज्या बातम्यापुणे

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 444 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी


पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –
पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव वाढत आहे. काल पुण्यात 524 रुग्ण आडळून आले होते तर 36 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये थोडी घट झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) 444 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. रुग्ण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजाराच्या वर गेली आहे.

शहरात आजपर्यंत 5 लाख 11 हजार 585 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 99 हजार 629 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात शहराबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरामध्ये सध्या 2838 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 101 रुग्ण गंभीर आहेत. तर 81 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6573 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 38 लाख 86 हजार 060 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)

Web Title : Pune Corona | Diagnosis of 444 patients of Corona in Pune
city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी

Ajit Pawar | कोरोनाची रूग्ण संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांनी असी घ्यावी डोळ्यांची काळजी

 

Back to top button