Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 207 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Corona |पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. शहरात नविन रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 207 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एक मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 207 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 874 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 152 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 61 हजार 624 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 879 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील 03 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4371 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी (दि.13) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 8,758 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 12 लाख 01 हजार 345 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 207 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Sputnik Light | खुशखबर ! पुढील महिन्यात येतेय ‘सिंगल डोस स्पूतनिक लाईट’ व्हॅक्सीन, जाणून घ्या किती असेल किंमत

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,686 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 238 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी