Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 48 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण काहींसे घटले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 48 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 48 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 620 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 44 रुग्ण कोरोनामुक्त (Pimpri Corona) झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 72 हजार 405 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 449 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 449 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात याआधी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4497 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 8,092 जणांचे लसीकरण

बुधवारी (दि.10) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 8092 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 23 लाख 70 हजार 404 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 48 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा