Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 17 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
![Pimpri Corona | Diagnosis of 17 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics](https://i0.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2021/12/corona-pimpri-1.jpg?resize=750%2C450&ssl=1)
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनावर (Pimpri Corona) नियंत्रण मिळवण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले असतानाच ओमायक्रॉन व्हेरिएंटचे (Omycron variant) 6 रुग्ण शहरात आढळून आल्याने चिंता वाढली आहे. पिंपरी चिंचवड शहरात (Pimpri Corona) गेल्या 24 तासात शहरामध्ये 5 हजार 646 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आजपर्यंत करण्यात आलेल्या 22 लाख 35 हजार 648 जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 2 लाख 77 हजार 722 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 2 लाख 73 हजार 603 जणांनी कोरोनावर (Pimpri Corona) मात केली आहे. सध्या शहरामध्ये 337 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून यामध्ये 213 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) मध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 124 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. आजपर्यंत शहरात 4 हजार 513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी (दि.06) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 15 हजार 690 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 26 लाख 86 हजार 852 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 17 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
घाईगडबडीत कधीही रिडिम करू नका Mutual Fund, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होऊ शकते पैशाचे नुकसान !