Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 193 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Corona) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत चढ उतार होत आहे. शहरात कोरोनामुक्त (Pimpri-Chinchwad Corona) होणाऱ्यांची संख्या आज कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 193 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्यांचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 01 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 193 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 667 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 137 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 61 हजार 472 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 826 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरातील 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4369 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.12) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 4022 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 11 लाख 92 हजार 587 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | Diagnosis of 193 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Ganeshotsav | यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील गणेश मंडळाचं झालं एकमत (व्हिडीओ)

UBI Recruitment 2021 | उमेदवारांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध जागांसाठी भरती

Police Suspended | आरोपीला मदत करणे पडले महागात, पोलिसाचे तडकाफडकी निलंबन; जाणून घ्या प्रकरण