Pimpri Corona News | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 392 नवीन रुग्ण, 415 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad City) कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती तर बरे होणाऱ्या रुग्णांच्या (Recover patient) संख्येत घट झाली. रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय (Active patient) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 392 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. Pimpri corona News 392 new patients of Corona in Pimpri Chinchwad

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 392 नवीन रुग्ण (New patient) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील (PCMC City) कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 58 हजार 734 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 415 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 53 हजार 147 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 295 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यामध्ये 02 रुग्ण शहरातील (City) आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील (Out of City) आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4292 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी (दि.3) शहरामध्ये 75 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर शहरातील 23 खासगी लसीकरण केंद्रावर (Private Vaccination Center) लसीकरण (Vaccination) करण्यात आले.
शनिवारी दिवसभरात 19957 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 6 लाख 83 हजार 525 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri corona News 392 new patients of Corona in Pimpri Chinchwad

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

7th Pay Commission । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! बँक अकाऊंटमध्ये जमा होणार 2,18,000 रूपये; जाणून घ्या कसे

New Liquor Licence | मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होण्याची शक्यता

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून चौकशी