Pimpri Corona Update | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’ रुग्णवाढ घटली; आज दिवसभरात केवळ 113 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona Update) तिसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. याचदरम्यान रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 113 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 404 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 06 हजार 208 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 113 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 227 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 404 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 51 हजार 078 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 2271 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 142 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2129 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरामध्ये 02 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 01 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | Comfortable Corona morbidity declines in Pimpri Chinchwad Today only 113 new patients per day learn other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा