Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1696 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Pimpri Corona Update) रुग्णांच्या संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 1696 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 1696 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 50 हजार 738 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 3492 रुग्ण कोरोनामुक्त (Pimpri Corona Update) झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 33 हजार 684 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरामध्ये सध्या 13,213 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहराबाहेरील 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,572 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 6919 जणांचे लसीकरण
शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 6 हजार 919 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 32 लाख 87 हजार 943 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pimpri Corona Update | Diagnosis of 1696 corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Update | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 5521 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nitesh Rane | नितेश राणे यांना मोठा दणका ! 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

 

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे’