Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 91 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona Update) प्रादुर्भाव कमी होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या पन्नासच्या आत आल्याने शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 41 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 91 रुग्ण बरे झाले आहेत.

 

पिंपरी चिंचवडमध्ये आजपर्यंत 28 लाख 43 हजार 180 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 3 लाख 58 हजार 751 जणांना कोरोनाची (Pimpri Corona Update) बाधा झाली आहे. यापैकी 3 लाख 54 हजार 454 रुग्ण बरे झाले आहेत. मागिल काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या (Recover patient) रुग्णांची संख्या अधिक आहे.

 

शहरामध्ये सध्या 408 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 47 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 361 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज हद्दीबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

मंगळवारी (दि.1) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 5,088 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरामध्ये 34 लाख 24 हजार 746 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | In the last 24 hours 91 patients in Pimpri Chinchwad have been ‘corona free find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


Ashish Shelar | ‘उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, नवाब मलिकांना…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

 

Weight Gain | ‘या’ 3 योगासनांद्वारे महिनाभरात वाढवू शकता वजन, जाणून घ्या

 

Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का