Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2947 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल शहरामध्ये 4376 रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये थोडी घट झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 2947 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत असताना ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 11 हजार 768 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2947 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 30 हजार 497 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2367 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 98 हजार 520 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 28,166 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 609 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 27,557 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरामध्ये 03 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Updates | 2947 new patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा