Pimpri Corona Updates | चिंता वाढली! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2000 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल शहरामध्ये 1706 रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 2065 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात रुग्ण वाढत असताना आज ओमिक्रॉनचा (Omicron variant) एक रुग्ण आढळून आला आहे. त्याचवेळी लहान मुलांना कोरनाची लागण होत असल्याने चिंता वाढली आहे. मागील 11 दिवसात शहरात तब्बल हजारांच्या वर मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 11 हजार 630 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2065 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 89 हजार 984 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 591 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 76 हजार 701 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरात 9486 सक्रिय रुग्ण
शहरामध्ये सध्या 9486 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 454 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 9032 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरामध्ये एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :-  Pimpri Corona Updates | Anxiety increased More than 2000 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा