गुन्हे शाखेकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – संशयावरून ताब्यात घेतलेल्या एकाकडून बेकायदेशीर पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. ही कामगिरी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी कुदळवाडी, चिखली येथे रविवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास केली.

सचिन बबुशा शेटे (24, रा. शेटेवाडी, वाडा, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेटे हा रविवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे आला होता. त्यावेळी संशयावरून चौकशी केली असता त्याच्याकडे 25 हजार 500 रुपयांचे देशी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतुस आढळून आले. पिस्तूल काडतूस जप्त करून त्याला अटक करण्यात आली.

हि कामगिरी वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे याबच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक लांडगे, अमित गायकवाड, गणेश सावंत यांच्या पथकाने केली. तपास चिखली पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/